बीड
पोक्सो प्रकरणात दिलासा: अॅड. दीपक ससाणे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस जामीन मंजूर

पोक्सो प्रकरणात दिलासा: अॅड. दीपक ससाणे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस जामीन मंजूर
बीड |.
बीड येथील पोक्सो प्रकरणातील आरोपीस बीड सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून, या निकालामध्ये अॅड. दीपक ससाणे यांच्या प्रभावी युक्तिवादाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे.
उपलब्ध फिर्याद आणि एफआयआरनुसार, सदर प्रकरणात प्रतीक प्रमोद धर्माधिकारी यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम २९४ तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम १३ व १४, आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६७ व ६७(बी) अशी गंभीर कलमे लागू करण्यात आली होती. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप होता. या प्रकरणाची नोंद बीड सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
सदर केस अॅड.ससाणे यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात तथ्यांवर आधारित आणि कायद्याच्या चौकटीत राहून भक्कम युक्तिवाद मांडला. पुराव्यांची स्थिती, तपासातील बाबी आणि कायदेशीर मुद्दे प्रभावीपणे मांडल्यामुळे न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.
या निर्णयानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, बीडमधील नागरिकांकडून अॅड.ससाणे यांचे अभिनंदन केले जात आहे.या महत्वपूर्ण कामात ॲड.ससाणे यांना ॲड.नामदेव जाधव, ॲड.अजित ओव्हाळ यांनी मोलाचे सहकार्य केले. अल्पावधीत जामीन मिळवून देण्याच्या त्यांच्या कामगिरीमुळे ते एक नामांकित आणि विश्वासार्ह वकील म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
कायदेशीर क्षेत्रात सातत्याने प्रभावी कामगिरी करणारे अॅड. दीपक ससाणे यांच्याकडे आता अनेक प्रकरणांमध्ये आशेने पाहिले जात आहे



