बीड
बीडमध्ये गोडाऊनला आग, आ. विजयसिंह पंडित यांनी केली पाहणी

बीडमध्ये गोडाऊनला आग, आ. विजयसिंह पंडित यांनी केली पाहणी
=================
अग्नीशामक दलाच्या गाड्या नादुरुस्त असल्याची गंभीर बाब समोर येताच
=================
दुरुस्तीच्या सुचना देत दोन नव्या गाड्या घेण्याचा घेतला मोठा निर्णय
================
बीड दि.९ (प्रतिनिधी) बीड शहरातील सहयोग नगर भागातील गोडाऊनला आज सकाळी आग लागली, या ठिकाणाची बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. विजयसिंह पंडित यांनी पाहणी केली, यावेळी अग्नीशामक दलाच्या गाड्या नादुरुस्त असल्याची गंभीर बाब समोर येताच त्यांनी दुरुस्तीच्या सुचना देत दोन नव्या गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून बीड नगरपालिकेच्या अग्निशामक दलातील गाड्या नादुरुस्त असल्याची गंभीर बाब यावेळी समोर आली. महत्त्वाच्या वेळी अग्निशामक दलाच्या गाड्या सज्ज असणे आवश्यक असताना गेल्या अनेक दिवसापासून याकडे येथील पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना यावेळी संबंधित प्रशासनाला आ. विजयसिंह पंडित यांच्याकडून देण्यात आल्या. बीड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाकडे चार अग्निशामक गाड्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून सेवेत दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या.
राज्याचे विकासभिमुख उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलेला असून त्या लवकरच बीड करांच्या सेवेत दाखल होतील.यावेळी माजी नगरसेवक इकबाल शेख, नगरसेवक महेश धांडे, महेश राऊत, संतोष जाधव यांच्यासह या भागातील नागरिकांची उपस्थिती होती. सदर आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्या टीम मधील कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.



