बीड

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

जामखेड प्रतिनिधी: दि. ६ जानेवारी – संत नागेबाबा मल्टिस्टेट चे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी पुढाकार घेत असते. तसेच, वाचन संस्कृती टिकवण्याचे कामही सतत करत असते. सालाबाद प्रमाणे यावर्षीही त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करून समाजातील पत्रकारांचे योगदान विशेषतः नमूद केले.

दि.६ जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शाखाधिकारी वैभव ताबे यांनी पत्रकार बांधवांना पेन, डायरी, मल्टिस्टेटचे दिनदर्शिका आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी जामखेड शाखेचे कर्मचारी अमोल जताडे, सतिश वर्मा, अक्षय धोत्रे, शिवराज डोके यांच्यासह पत्रकार दत्तात्रय राऊत, अशोक वीर, धनराज पवार, पप्पूभाई सय्यद, किरण रेडे, फारूख शेख, अजय अवसरे, निलेश वनारसे, सुजित धनवे आदी उपस्थित होते.

Back to top button