शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कायम प्राधान्य देणार- शिक्षक आमदार जयंत आसगावकर

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कायम प्राधान्य देणार- शिक्षक आमदार जयंत आसगावकर
पुणे प्रतिनिधी :-ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 16 जून रोजी होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केले.
नवगतांचे स्वागत आणि शाळा पूर्वतयारी आढावा बैठकीमध्ये विद्यालयाच्या कामकाजबाबत शिक्षकांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांमध्ये पर्यायने समाजामध्ये जी मूल्य रुजलेली आहेत त्याचा भक्कम पाया फक्त शिक्षकामुळेच तयार होतो अशी भावना व्यक्त करताना टप्पा वाढ अनुदान, अंशतः अनुदानित जुनी पेन्शन योजना शिक्षकेतर भरती यासंदर्भात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर सुयोग्य मार्गदर्शन केले. शिक्षक आमदार संघातील सर्व शाळांना संगणक आणि कलर प्रिंटर दिल्याचा पुनर्विचार केला. विद्यालयातील विविध उपक्रमांच्या अनुषंगाने शिक्षकांच्या असणाऱ्या योगदानाबद्दल सर्वांचे कौतुक करताना कोणतीही शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची भावना आपल्या मनोगत आपण व्यक्त केली.
याप्रसंगी अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वतीने श्री रामदास वहिले यांनी आपल्या बांधवांच्या व्यथा सांगितल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री अजित वडगावकर यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या अडचणी आमदार महोदय समोर मांडल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश वडगावकर व प्राचार्य एस. जी. मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



