📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  द्यावी.. राजेंद्र मस्के

शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  द्यावी.. राजेंद्र मस्के

तात्काळ पंचनामे करा

बीड प्रतिनिधी:-मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. परंतु13 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे  जिल्ह्यातील  १७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची झाल्याची नोंद समोर आली आहे. अतिवृष्टीचा
जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेत पिके, शेतजमीन, तर अनेक ठिकाणी रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घ्यावी.
व तातडीने पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी. तसेच ग्रामीण भागातील रस्ते पुल सुधारणांसाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्हाभरात कोसळलेल्या अतिवृष्टी मुळे कापूस सोयाबीन, तूर ,उडीद, मूग, बाजरी या सारख्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते झाले. असून काही ठिकाणी फळबागांचे ही नुकसान झाले आहे. शेत जमिनी वाहून गेल्या तर काही ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे  नुकसान झाले. ग्रामीण भागातील रस्ते व पूलांचे अतोनात नुकसान झाले. रस्ते व पुलांच्या नुकसानी मुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
यावर्षी  खरीपाची जवळपास शंभर टक्के पेरणी  झालेली आहे.
विम्याचा खर्च जास्त असल्याने अनेक शेतकरी विम्या पासून वंचित आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.

Back to top button