सोनेगाव येथे रक्तदान शिबिर; राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत उपक्रम

सोनेगाव येथे रक्तदान शिबिर; राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत उपक्रम
जामखेड प्रतिनिधी:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री संत गजानन महाराज महाविद्यालय, खर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष शिबीर तालुक्यातील सोनेगाव येथे आयोजित केले असून तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन फित कापून करण्यात आले. रक्तदानासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष वैद्यकीय टीम उपस्थित होती.
यावेळी सुरेश भोसले बोलताना म्हणाले,
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत, ही समाजासाठी सकारात्मक दिशा आहे. रक्तदान म्हणजे माणुसकीची सर्वोच्च सेवा. तरुणांनी अशा उपक्रमांत पुढाकार घेतला तर गाव,समाजाचा विकास अधिक वेगाने होईल. श्री संत गजानन महाराज महाविद्यालय व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक.
या कार्यक्रमास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन आवारे, सेवा सोसायटीचे चेअरमन प्रदीप भोसले, माजी चेअरमन सुग्रीव वायकर, छत्रभुज बोलभट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांनी सोनेगाव सेवा सोसायटीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी चेअरमन प्रदीप भोसले यांनी त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सुरेश भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रसेन आवारे आदी उपस्थित होते.



