सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने 1 लाख वह्या वाटपाचा शुभारंभ

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन वतीने 1 लाख वह्या वाटपाचा शुभारंभ
सोलापूर संपादक महेश पवार
सागर सिमेंट व एम के फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता १ लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सागर सिमेंट कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडले.यावेळी जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ
दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर
कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर, रमीज साबुनगर, प्रकाश करपे, मल्लेशी मंदोली, रमेश कलशेट्टी, एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यपक गुरुनाथ वांगीकर, हणुमंत मोतीबाने,काशिनाथ भातगुणकी, दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संचालक नागेश बिराजदार, मल्लिकार्जुन धारसंगे,कलप्पा हंगरगी,सुरेश ढवले, प्रकाश राचेट्टी, अशोक बगले, आप्पाशा हंचनाळ आदी उपस्थित होते.यावेळी सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापक तथा
एम.के. फाऊंडेशनचे
महादेव कोगनुरे म्हणाले,
गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करीत असतो. वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठीच चालू केले नसून, हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे अखंडपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील.विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल, ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा मला नेहमीच राहिला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो.यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष स्वामी तसेच बिराजदार, होसाळे,वांगीकर,भतगुणकी यांनी कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.
कार्यक्रमास
सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगौडा बिराजदार यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मांडले.
चौकट
अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा करू
मी खूप गरीब कुटुंबातून संघर्ष करून इथंपर्यंत पोहोचलो आहे,शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मला माहित आहे, त्या परिस्थितीतून मी आलो आहे म्हणून दरवर्षी माझ्या ताकतीनुसार मी गरजू गरीब विद्यार्थ्यांना एक लाख वहीचे वाटप करीत आहे.भविष्यात ईश्वराने मला आणखीन बळ,ताकद दिल्यास यापेक्षा जास्त वह्या वाटप करण्याचा आणि सामाजिक काम करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत असे सागर सिमेंटचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.



