बीड

माल निघालाय पण भाव ढासळले  ; बारदाणा, वाहतूक भांडं, पिशव्या भरायलाही परवडंना ; मुळुकवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी जालिंदर ढास यांची खंत :- डॉ.गणेश ढवळे

माल निघालाय पण भाव ढासळले  ; बारदाणा, वाहतूक भांडं, पिशव्या भरायलाही परवडंना ; मुळुकवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी जालिंदर ढास यांची खंत :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.०४) गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडे कल वाढला आहे .त्यामुळे खरीप, रब्बी हंगामात कांद्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असुन दोनही ऋतुत कांदा लागवड करत आहेत.कांदा उत्पादनात वाढ झाली परंतु कांद्याला सद्यपरिस्थितीत भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भर उन्हाळ्यात कांदा काटणीला मजुर मिळत नाहीत.त्यातच उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्यावर असताना शेतकरी कांदा काढणी करत आहेत. कांद्याला फेब्रुवारी मध्ये प्रति किलो २०-३० रूपये बाजारभाव होता. तो टिकुन राहिल असे वाटत असतानाच बाजारभाव कमी होऊन ११ रुपये किलोवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकरी ढासळलेल्या भावामुळे चिंतेत असुन भाडे वाहतुक,बारदाणा, पिशव्या भरायला सुद्धा परवडेना अशी खंत बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी जालिंदर सुर्यभान ढास यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलुन दाखवली.

माल निघालाय पण भाव नाही; बारदाणा, वाहतूक खर्च, पिशव्या भरायला परवडंना :- जालिंदर सुर्यभान ढास ( कांदा उत्पादक शेतकरी मुळुकवाडी)

बीड तालुक्यातील कांदा उत्पादक गाव म्हणून ओळख असलेल्या मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांना कांदा पिकाने साथ दिली नाही. मुळुकवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी जालिंदर सुर्यभान ढास यांनी यावेळी माल निघलाय पण भाव नाही,अडीच एकर कांदा लागवड केली होती.२०० पोते कांदा बेंगलोरच्या बाजारात विकला, सध्या ११ रूपये किलो भाव असुन वाहतूक खर्च,आडत, हमाली आदी जाऊन ५-६ रूपये भाव पडत असल्याचे सांगत बारदाणा आणि पिशव्या भरायला परवडत नसल्याची खंत व्यक्त केली.

कांद्याचे दर वाढल्यानंतर दर रोखण्यासाठी  निर्यातबंदी,कांदा आयात आदींसाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारने दरवाढ झाल्यावर लक्ष देऊ नये :- डॉ.गणेश ढवळे
—-
कांद्याचे भाव वाढल्यानंतर शासनाकडून दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.केंद्रीय पथक येतात,पाहणी करतात, निर्यातबंदी सारखी पावले उचलतात,आयात केली जाते.
मात्र कांद्याचे भाव कोसळल्यानंतर मात्र शासन शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पहात नाही. त्यामुळे भाव वाढल्यानंतर सरकारने लक्ष देऊ नये अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

Back to top button