बीड

महिला व बालविकास विभागाचा तुघलकी कारभार ; जिथं शाळांनाच ईमारती नाहीत ; म्हणे अंगणवाडीचे शाळेत स्थलांतर करा ; निधीअभावी सरकारकडून पळवाट तर ५५ कोटींचा प्रस्ताव धुळखात पडुन :- डॉ.गणेश ढवळे

महिला व बालविकास विभागाचा तुघलकी कारभार ; जिथं शाळांनाच ईमारती नाहीत ; म्हणे अंगणवाडीचे शाळेत स्थलांतर करा ; निधीअभावी सरकारकडून पळवाट तर ५५ कोटींचा प्रस्ताव धुळखात पडुन :- डॉ.गणेश ढवळे

बीड:- ( दि.०४ ) ज्या अंगणवाडी केंद्राना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने दि.२ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे.परंतु अध्यादेश काढण्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांना तरी पुरेशा इमारती आहेत का?? सुस्थितीत आहेत का? सुरक्षित आहेत का? याचा विचार केलेला नाही. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन त्याठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविले असुन ७४९ वर्गखोल्यांची किरकोळ दुरुस्ती तर ८५६ वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या तर काही ठिकाणी झाडाखाली, समाज मंदिर, चावडीत बसुन शिक्षण घेत आहेत.आता या आदेशामुळे शासनाचा तुघलकी कारभार समोर आल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे.

सविस्तर माहितीस्तव

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःचे इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमधील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे. सदरील धोरण जी अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागेत, समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरता लागू करण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्र स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करायचे आहे अशा ठिकाणांमधील अंतर हे एक किलोमीटर पेक्षा जास्त नसावे, अंगणवाडी वर्गखोली देताना शाळेमधील स्वयंपाकगृह ,स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी ,क्रीडांगण, क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रांमधील बालकांकरीता वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी उघड्यावर बसत आहेत, अनेक ठिकाणी वर्ग खोल्या कमी पडत असल्याने दोन-तीन वर्ग एकत्रित बसवावे लागत आहेत. शासनाने अंगणवाडीसाठी नवीन अध्यादेश काढून गावपतळीवर काय स्थिती आहे यापासून सरकार कोसोदुर असल्याचे दाखवून दिल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती

बीड जिल्ह्यात यु -डायस २०२३-२४ च्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या २४७६ शाळा आहेत.या शाळांमध्ये १०,४७९ वर्गखोल्या असुन यातील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन याठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविले आहे.तसेच ७४९ वर्गखोल्यांची किरकोळ दुरुस्ती आणि ८५६ वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.

शिक्षणावर ५ टक्के खर्च

मागील दोन वर्षात शाळांवर केलेला खर्च पाहिला तर तो तिर्थक्षेत्रांपेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे.सन २०२३-२४ मध्ये ३०.६३ कोटी तर २०२४-२५ मध्ये ३१.८६ कोटींचा खर्च शाळांवर केलेला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या एकुण खर्चापैकी ५ टक्के निधी शिक्षणावर खर्च केला जातो.

५५ कोटींचा नव्याने प्रस्ताव
—–
५४१ वर्गखोल्यांच्या मोठ्या दुरुस्ती करीता १३ कोटी १४ लाख ६३ हजार रूपयांचा निधी व ५१९ धोकादायक वर्ग खोल्यांच्या बांधकाम व पत्र्यांच्या शेडमध्ये भरणाऱ्या ३८ शाळांमध्ये ३८ वर्गखोल्या बांधकामासाठी असे एकुण ५५ कोटी ७० लाख रुपये निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

Back to top button