बीड

सागर देशपांडे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी बैठक

सागर देशपांडे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा
निषेध करण्यासाठी आज सायंकाळी बैठक

बीड: शहरातील प्रभाग क्रं.7 मधील भाजपाच्या नगरसेविका सौ.भाग्यश्री  देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला. कोणतेही कारण नसताना वाद उकरुन काढला. दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सोमवारी (दि.13) सायंकाळी  7 वाजता बीड शहरातील सुभाष रोडवरील श्री दत्त मंदिरात   बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्वपक्षीयांसह नागरिक उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी रात्री सागर देशपांडे हे आपल्या घराच्या दारात बोलत उभे असताना अचानक जाधव त्यांच्या मुलाला आणि इतर पाच ते सहा जणांना घेऊन आले आणि त्यांनी सागर देशपांडे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे ज्यात स्पष्टपणे दिसते आहे की, देशपांडे हे फोनवर बोलत असताना जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी समोरून येत पोटात डोक्यावर पाठीवर लाथा बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करत देशपांडे यांना जखमी केले.या प्रकरणी सागर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव व इतरांवर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सोमवारी सायंकाळी 7 वाजता बीड शहरातील सुभाष रोडवरील श्री दत्त मंदिरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button