बीड

प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्याने घरकूल मिळविण्यासाठी सेल्फ सर्व्हे करून घ्या

प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्याने घरकूल मिळविण्यासाठी सेल्फ सर्व्हे करून घ्या
 
आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन
बीड, दि.२८ (प्रतिनिधी) :- पात्र असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नव्याने घरकूल मिळणार असून. त्याकरिता सध्या ऑनलाईन सेल्फ सर्व्हे करणे चालू आहे. बीड मतदारसंघातील ज्या नागरिकांना घर नाही अशा निकषपात्र नागरिकांनी आपल्या मोबाइलद्वारे किंवा आपल्या ग्रामसेवकामार्फत ३० एप्रिल पर्यंत सेल्फ सर्व्हे करून घ्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
             प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्ह्याभरात सध्या सद्या सर्व्हे सुरु आहेत. यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करू शकतात. निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत आपली नोंदणी करावी, नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असून त्या अगोदर बीड मतदारसंघातील पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाप्रकारे करावा सेल्फ सर्व्हे
सेल्फ सर्व्हे करण्यासाठी आवास प्लस- २०२४ हे शासनाचे अधिकृत प्ले-स्टोअरवरून आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करावे, नंतर आधार फेस आरडी हे ॲप देखील इंस्टॉल करुन घ्यावे, त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन करून ॲपवर विचारलेली माहिती भरावी, शेवटी आपल्या कच्या घराचा फोटो व आपण बांधणार असलेल्या घराची जागा यांचे फोटो अपलोड करावा, आधार व जॉब कार्डचे व्हेरिफिकेशन करून केलेला सर्व्हे अपलोड करावा.
काही अडचण असल्यास संपर्क साधा
घरकुल सेल्फ सर्व्हेच्या प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अडचण असल्यास आपल्या ग्रामसेवक / ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच काही तांत्रिक अडचण असल्यास १८००-११०-१११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करावा. यासोबतच प्रशासनासंबंधित काही तक्रार असल्यास ९७६६२७२७२४, ९३७३६०३११९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे.
Back to top button