बीड
लिंबागणेश येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

——
लिंबागणेश:- ( दि.२८ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश महसूल मंडळातील गावांसाठी महसूल विभागाच्या वतीने” छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर ” अंतर्गत “महाराजस्व समाधान शिबिर “जिल्हाधिकारी विवेक जान्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २८ शनिवार रोजी सकाळी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार आण्णासाहेब वंजारे, मंडळ अधिकारी महादेव जायभाये,ग्राम महसूल अधिकारी तलाठी लिंबागणेश गणपत पोतदार, तलाठी नारायण दराडे अंजनवती, तलाठी शेख गफुर लोणीघाट,तलाठी विपुल बनकर बेलखंडी पाटोदा,तलाठी अक्षय शिंदे बोरखेड,पुरवठा निरीक्षक श्रीराम वायभट,पुरवठा निरीक्षक संतोष मुळीक महसूल सेवक ललित काकडे आदींची उपस्थिती होती.
तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रेशनकार्ड, अपंग नोंदणी,वारस नोंदी, विवाह नोंदणी,जाती प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र,जातीचे दाखले वाटप, आधार लिंक,आदि विविध सेवा पुरविण्यात आल्या.ज्या अनुदान डीबीटी यावेळी बंद पडले होते अशा लाभार्थ्यांची डीबीटी कामे पूर्ण करण्यात आली.तसेच अग्रो स्टार फेरफार अदालत, जिवंत सातबारा मोहीम, नकाशावरील रस्ते खुले करणे इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी जायभाये आणि तलाठी गणपत पोतदार यांनी कामकाज पाहून कार्यक्रम यशस्वी केला.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, जीवन मुळे,अँड.गणेश वाणी, संतोष भोसले,शेख अझीम, संतोष वाणी,भालचंद्र वायभट,सुंदरराव येडे,जितु निर्मळ,केशव गिरे, वैजनाथ भोसले आणि डॉ.गणेश ढवळे व पत्रकार हरीओम क्षीरसागर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी महिला बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.यावेळी डीबीटीचे काम मोठ्या प्रमाणात झाल्याबद्दल लाभार्थ्यांनी व गावकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले