बीड

केंद्र सरकारच्या कामगार – शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांच्या निषेधार्थ ” भारत बंद” ला लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे

केंद्र सरकारच्या कामगार – शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांच्या निषेधार्थ ” भारत बंद” ला लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- ( दि.०९ ) केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज दि.९ जुलै बुधवार रोजी १० केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन विविध शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांच्या समन्वयाने देशव्यापी संप पुकारत “भारत बंद” ची हाक दिली असुन याला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामस्थांनी या भारत बंदला पाठींबा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर केंद्र सरकारच्या विरोधात ” कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे राबविणा-या सरकारचा धिक्कार असो, कामगार एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ . गणेश ढवळे,सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अशोक जाधव, पांडुरंग वाणी,सुरेश निर्मळ, भालचंद्र गिरे,आश्रुबा गिरे, सतिश वायभट, संजय घोलप, चिंतामण ढास, गणपत घोलप, बालाजी निर्मळ,सय्यद अख्तर, संजय पावले, जनार्दन भोसले, अंकुश गायकवाड, ज्ञानोबा निर्मळ, बाजीराव दशमे,शेषेराव तागड, हरिभाऊ कदम,बाळु सोनावणे, चोखोबा निर्मळ, जनार्दन वाणी , सर्जेराव घरत, बाबासाहेब वायभट, भास्कर वाणी आदी सहभागी होते. यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, गोविंद बडे,पो.ह. सतिश राऊत आणि सुदाम शेलार यांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले तर कामगारांच्या हक्कांवर गदा :- डॉ.गणेश ढवळे

केंद्र सरकारच्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग ) कायदा ,आवश्यक वस्तू कायदा, जमिन अधिग्रहण कायदा या नरभक्षी शेतकरी विरोधी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.तर कामगार संघटनांनी संसदेने मंजूर केलेल्या ४ कामगार संहितेवर तिव्र आक्षेप घेतला असुन या संहितामूळे कामगारांचे हक्क कमकुवत होत असुन कामगार संघटनांची ताकद कमी होत असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा लिंबा गणेश करांमध्ये तिव्र संताप असुन याविरोधात निदर्शने करत “भारत बंद” ला समर्थन असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

Back to top button