बीड

अमृत महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी प्रभाकर देशमुख यांची विद्यालयास ७५ हजारांची देणगी

अमृत महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी प्रभाकर देशमुख यांची विद्यालयास ७५ हजारांची देणगी

जामखेड प्रतिनिधी :
पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रभाकर रामकृष्ण देशमुख, पुणे यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेस रुपये ७५,००० देणगी स्वरूपात देऊन आपले विद्यार्थी कर्तव्य पार पाडले आहे.

१९५८-५९ च्या एसएससी बॅचचे विद्यार्थी असलेले देशमुख, तत्कालीन जनता विद्यालय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेविषयी आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करताना, “संस्था अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतेय, या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आपण काही करू शकतो का?”, या सद्भावनेतून त्यांनी ही देणगी दिली आहे. ही रक्कम त्यांनी आपल्या मातोश्री कै. सौ. सिताबाई रामकृष्ण देशमुख व वडील कै. रामकृष्ण यशवंत देशमुख यांच्या स्मरणार्थ अर्पण केली.

देशमुख यांनी माध्यमिक शिक्षण ल.ना. होशिंग विद्यालयात घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा विद्यापीठात पूर्ण केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या नामांकित संस्थेत दीर्घकाळ अध्यापन करून २००१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तसेच, सेवानिवृत्तीनंतरही पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये इंग्रजी अध्यापनाची सेवा त्यांनी सतत सुरू ठेवली आहे.

विद्यालयाप्रती कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांविषयीची तळमळ त्यांच्या या उपक्रमातून दिसून येते. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात दिलेल्या या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button