बीड

प्रवीण भालेराव यांचे एल आय सी एजंट नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक पद अपात्र

प्रवीण भालेराव यांचे एल आय सी एजंट नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक पद अपात्र

अप्पर निबंधक सहकारी संस्था पतसंस्था विभागाचा निकाल

अहिल्या नगर(प्रशांत बाफना) – अहिल्यानगर एल आय सी एजंट्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिवाजीनगर पुणे या राज्य कार्यक्षेत्र असलेल्या सहकारी संस्थाचे संचालक श्री प्रवीण गजानन भालेराव यांनी महाराष्ट्र राज्य सरकार कायदा १९६१ नियम ५७मधील तरतुदी नुसार संचालक संस्थेच्या कोणत्याही व्यवहारात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संस्थेच्या हितसंबंध ठेवणार नाही, लाभ घेणार नाही अशी तरतूद असताना श्री प्रवीण गजानन भालेराव यांनी संस्थेच्या सभासदाची अपघाती विमा
पॉलिसी आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर, दुरुपयोग करून आपल्या मार्फत केली अशी तक्रार सभासद प्रमोदकुमार छाजेड, प्रशांत तरडे, बाळासाहेब घुले यांनी सहकार आयुक्त व निबंधक पतसंस्था विभाग पुणे यांचे कडे केली होती.
त्यावर साधारण १२ तारखा पडल्या वेळोवेळी दोन्ही पक्षाच्या वतीने आपले म्हणणे तोंडी लेखी मांडण्यात आले व अप्पर निबंधक पतसंस्था श्रीकृष्ण वाडेकर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे एकूण घेऊन प्रवीण भालेराव यांनी केलेले कृत्य चुकीचे आहे, हे माहिती
असताना जाणीवपूर्वक केले. यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (अ) व नियम ५७ अन्वये राज्य शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून संचालक म्हणून अपात्र घोषित करून पुढील एका कालावधीची मुदत समाप्त होई पर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेचा संचालक, कोणत्याही समितीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास, पुन्हा स्वीकृत केले जाण्यास किंवा पुन्हा नाम निर्देशित केले जाण्यास अपात्र घोषित केले आहे. असा निकाल अप्पर निबंधक सहकारी संस्था पतसंस्था विभागाने दिल्याने सहकारी संस्था चे संचालक यांना चपराक बसला आहे अशी प्रतिक्रिया प्रमोदकुमार छाजेड यांनी दिली.

Back to top button