📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

संदीप जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश

संदीप जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश
बीड (प्रतिनिधी):-बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आणि अ‍ॅड.महेश धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.
संदीप जाधव हे बीड शहरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून त्यांनी रक्तदान शिबिरे, गरजू रुग्णांना मदत, महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे आयोजन यांसारखी उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, संदीप जाधव यांच्या कार्याचा योग्य गौरव करून पक्ष त्यांना पुरेशी संधी देईल.या पक्षप्रवेशामध्ये मोठ्या संख्येने युवक आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे बीड शहरातील पक्षाची ताकद अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Back to top button