बीड

गेवराईत “युथ आयकॉन रणवीर काका पंडित चषक 2026” क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात समारोप

गेवराईत “युथ आयकॉन रणवीर काका पंडित चषक 2026” क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात समारोप
गेवराई | प्रतिनिधी
युवा नेते तथा युथ आयकॉन रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा क्रिकेट अकॅडमी, गेवराई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अंडर-17 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026” चा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. 21 मे ते 24 मे दरम्यान आर.बी. अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेला गेवराईसह बीड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी, खेळाडू व पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.
              स्पर्धेचा अंतिम सामना जिमखाना क्रिकेट क्लब, बीड आणि आदर्श क्रिकेट क्लब, बीड यांच्यात रंगला. चुरशीच्या लढतीत आदर्श क्रिकेट क्लब, बीड संघाने शानदार सांघिक खेळ करत विजेतेपद पटकावत “रणवीर काका चषक – पर्व 1” वर आपले नाव कोरले. तर जिमखाना क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते रणवीर काका पंडित यांनी अंतिम सामन्यासाठी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बक्षीस वितरण समारंभास मोहसीन भाऊ शेख, पत्रकार विनोद नरसाळे, भागवत जिजा जाधव व पत्रकार सुभाष सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ₹11 हजार 111 हे श्रीहरी पवार (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, गेवराई) यांच्या सौजन्याने देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक ₹7 हजार 111 हे संदीप मडके (सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात आले.
स्पर्धेसाठी विविध मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. ट्रॉफी सौजन्य मोहसीन भाऊ शेख यांनी केले. मंडप व साऊंड व्यवस्था विष्णुपंत घोंगडे (सरपंच, गढी) यांनी उपलब्ध करून दिली. पाणी व्यवस्था अमोल धूळधर यांनी केली. ग्राउंड मेंटेनन्ससाठी सतीश शिंदे यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. अशोक नाना काळे, बाळासाहेब दाभाडे व समाधान मस्के यांनीही स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक संजय धस, अझहर सर, लारा सर, निसार सर, राहुल सर, गोविंद सर, फिरोज सर, संजय चाबिलवाड, अक्षय सर व अतिक सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. तिलकचंद खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देत खेळातील स्पर्धात्मकता, शिस्त व खेळभावना वाढवण्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
Back to top button