बीड

काय करु बाई माझ्या नशिबाला, सि.ओ.साहेब आले जामखेड शहराला! – ठिय्या आंदोलनात हातात टाळ,आराधी गाण्याचा जल्लोष ;४ तास ठिय्या

काय करु बाई माझ्या नशिबाला, सि.ओ.साहेब आले जामखेड शहराला! – ठिय्या आंदोलनात हातात टाळ,आराधी गाण्याचा जल्लोष ;४ तास ठिय्या

नगर परिषद प्रशासनाच्या कार्यशैलीवर निशाणा ; आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन

जामखेड | प्रतिनिधी
“काय करु बाई माझ्या नशिबाला,सि.ओ.साहेब आले जामखेड शहराला!” या आराधी गाण्याच्या माध्यमातून जामखेड नगर परिषदे समोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व मित्र पक्षांच्या वतीने आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलनात रंग भरला.जामखेड शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, मोकाट जनावरांचा त्रास आणि रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या नागरी समस्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) व मित्र पक्षांच्या वतीने जामखेड नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन व गोंधळ घालण्यात आला.
या वेळी आंदोलकांनी नगरपरिषदेला निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी कार्यालयीन अधिक्षक संभाजी कोकाटे, आरोग्य व स्वच्छता अभियंता ज्ञानदेव मिसाळ, बांधकाम अभियंता अमिर शेख, लेखाधिकारी महेश कवादे यांनी आंदोलकांशी चर्चा करून येणाऱ्या आठ दिवसात कारवाई करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले, राजेंद्र कोठारी, विजयसिंह गोलेकर,प्रकाश सदाफुले,शहाजी राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,युवक तालुकाध्यक्ष काकासाहेब राळेभात, युवक शहराध्यक्ष वसिम सय्यद,मंगेश आजबे, प्रकाश काळे,प्राचार्य विकी घायतडक,प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार,दिनेश राळेभात,काँग्रेसचे प्राध्यापक कुंडल राळेभात,उमर कुरेशी,बाबासाहेब मगर,संजय डोके,शिवसेनेचे गणेश उगले,नगराध्यक्ष निखिल घायतडक,नगरसेवक बिभिषण धनवडे,युवा नेते समीर चंदन,ॲड हर्षल डोके, महेश राळेभात,आण्णासाहेब ढवळे,सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद,महेश भोसले,संदीप गायकवाड,डॉ.कैलास हजारे,प्रविण उगले, हरिभाऊ आजबे,अशोक घुमरे, सिध्देश्वर लटके,सचिन शिंदे,चाँद तांबोळी, विक्रांत अब्दुले, रामहरी गोपाळघरे,मनोज राळेभात,आण्णा मोरे,अमोल गिरमे,पांडुरंग माने,दादा महाडिक,शिवाजी ससाणे,मनोज कार्ले,बिलाल शेख,अजहर खान,फिरोज बागवान,आसिफ शेख,सागर जगताप,राम बाबर, तुषार खैरे,प्रतिक राळेभात,सोहेल बागवान,इमरान तांबोळी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट बातमी:
जामखेड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीमुळे शहरात अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे आंदोलन राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे असले तरी चर्चेच्या केंद्रस्थानी भाजपा युवा नेते अण्णासाहेब ढवळे होते. यामुळे सोशल मीडियावर व दूरध्वनीवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button