बीड

भाजपाचे गट कार्यकर्ता शेख मोहम्मद सलीम यांचा सत्कार

भाजपाचे गट कार्यकर्ता शेख मोहम्मद सलीम यांचा सत्कार
बीड (प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान गट कार्यकर्ता शेख मोहम्मद सलीम यांचा नुकताच बार्शी नाका येथे मित्रमंडळाच्या वतीने शेख कट्टू, माजेद पठाण  यांनी सत्कार केला. विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी नागरिकांच्या गरजा ओळखून प्रश्न सोडविण्याचे काम केले  तसेच 25 वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यामुळे हा सत्कार करण्यात आला.
शेख मोहम्मद सलीम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भाजीमंडईतील आडत व्यापार्‍यांसाठी तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गरजू नागरिकांसाठी विविध प्रश्न सोडविली तसेच शहरातील स्वच्छता अभियाना संदर्भात अनेक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. समाजातील सर्व घटकांशी जवळीक ठेवून त्यांनी केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक पातळीवरही आपली छाप सोडली आहे त्यामुळे शेख मोहम्मद सलीम यांना पक्षाने पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी सत्कार करतांना सर्वांनी केली ाअहे.
सत्कार सोहळ्यावेळी बोलताना सलीम यांनी सांगितले, समाजासाठी काम करणे हीच खरी सेवा आहे. पक्षाचे विचार आणि जनतेची गरज या दोन्हींचे संतुलन राखत मी हे कार्य करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन.
या सत्कारानंतर अनेक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सामाजिक कार्यात असलेली त्यांची तळमळ तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
Back to top button