त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त दि.7 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

बीड (प्रतिनिधी):- त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे अयोजन महाविहार धम्मभूमी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर शिवणी ता. जि.बीड या ठिकाणी करण्यात आले आहे. बीड शहर व परिसरातील धम्मप्रेमी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी हजारोंच्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडच्यावतीने मुख्य संयोजक पु.भिक्खु धम्मशील थेरो यांनी केले आहे.
शनिवार दि.07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मिरवणूक होईल. 9:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार येणार आहे. तर दुपारी 12 वाजता महाविहार धम्मभूमी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर शिवणी ता.जि.बीड. त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी हिंगोली येथील पु.भिक्खु पय्यावर्धन आणि नांदेड येथील पु.भिक्खुणी चारुशीला यांच्या प्रमुख धम्मदेसनेने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. यावेळी बीड जि.प.चे समाज कल्याण अधिकारी श्रावस्ती मेश्राम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. दुपारी 12 वा. शिवणी येथे भोजनदान, 12:30 वा. मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन 1 वा पाहुण्यांचे स्वागत मार्गदर्शन व धम्मदेशना, दुपारी 2 वा. कु. खुशबु मिसळे (नेर) जि. यवतमाळ यांचे ‘एका वादळाची संगिनी मी रमाई’ हे एकपात्री नाटक होणार आहे., दुपारी 3 वा. त्यागमूर्ती माता रमाई पुरस्काराचे वितरण होईल. व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ज्यांना ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी अलकाताई डोंगरे-9021786331, वंदनाताई वाघमारे- 9284976819,पंचशीलाआई सरपते – 9518711936, ऋतुजा डोळस-9370115861, शितलताई पालके-7248966227 यांच्याशी नांव नोंदणी दान जमा करण्यासाठी संपर्क साधावा. वरील सर्व कार्यक्रमास बीड शहर व परिसरातील धम्मप्रेमी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक पु. भिक्खु धम्मशील थेरो आणि प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड व त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.



