बीड

जि.प.व पं.स.निवडणुक वेगळा विचार करुन सर्व  जागा लढविणार- माजी आ.भीमराव धोंडे 

जि.प.व पं.स.निवडणुक वेगळा विचार करुन सर्व
जागा लढविणार- माजी आ.भीमराव धोंडे
लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; समर्थकांनी केली प्रचंड गर्दी ; रक्तदान ठिकठिकाणी  शिबीरांचे आयोजन
आष्टी (प्रतिनिधी) :-मला विधानसभेची उमेदवारी मिळणार असताना माझी उमेदवारी ऐनवेळी कट होऊन युती धर्मातील जागा बदल करण्यात आली.मला कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर  “अपक्ष ” निवडणुक लढवावी लागली.दरम्यान मला शरद पवारसाहेब,जयंत पाटील,खा. बजरंग सोनवणे यांचे फोन येत होते की, आमची उमेदवारी घ्या … परंतु मी त्यांची उमेदवारी घेतली नाही.राजकारणात विधानसभेची अपक्ष निवडणुक लढविणे जड व अवघड जाते याचा अनुभव घेतला तरी आपला क्रमांक दोनच आहे.२५ हजार मावळ्यांनी औरंगजेबाच्या १० लाख सैन्याला तोंड दिलेले आहे. आता आगामी जि.प.व पं.स.  निवडणुकीत चिकाटीने व निर्भिडपणे निवडणुक लढवली तर  यश आपलेच आहे असे सांगत जि.प.व पं.स.निवडणुक
वेगळा विचार करुन सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
      आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात  लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवारी दुपारी आयोजित कलेल्या मेळाव्यात ते
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
   लोकनेते भीमराव धोंडे  यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा नेते,मंत्री पंकजाताई मुंडे,आ.सुरेश धस,माजी आ.बाळासाहेब, माजी आ.साहेबराव दरेकर,माजी मंत्री अशोक पाटील,राजेंद्र जगताप, सुरेश नवले,सुशीला मोराळे,दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे,सेवानिवृत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, ह.भ.प.विठ्ठल महाराज गहिनाथगडकर, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु, महाराज राधाताई महाराज सानप, ह.भ.प. सविताताई शास्त्री, ह.भ.प. दिनकरराव तांदळे, ह.भ.प. आश्रु महाराज आजबे, हौसराव आजबे महाराज,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, लालाभाऊ कुमकर,ॲड. साहेबराव म्हस्के,दशरथ वनवे,कल्याण पोकळे,डाॕ. शिवाजी राऊत,राष्ट्रवादीचे नेते आण्णासाहेब चौधरी,ॲड. हनुमंत थोरवे,जगन्नाथ ढोबळे,
जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, रामराव खेडकर,सुरेश माळी, संतोषभैय्या चव्हाण,अंकुश मुंडे,ॲड.संभाजी दाहातोंडे, सतिषमामा झगडे,उत्तम बोडखे, चेअरमन बबन नन्नवरे,बाबा ससाणे,झुंबर चव्हाण,शेख अन्सारभाई,सरपंच बाळासाहेब गर्जे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,विठ्ठल बनसोडे, दिलीप काळे,वाय.आर.गर्जे, प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,अशोक साळवे,बाबुशेठ भंडारी,बळीराम गिते,संजय कवडे,संतोषशेठ मेहेर,प्राचार्य सुरेश बोडखे, किशोर खोले,एन.एम.बडे, अस्ताक शेख,महारुद्र खेडकर, इंदुबाई गोल्हार,चेअरमन बाळासाहेब शिंदे,चेअरमन अरुण सायकड,इंजि.पी.बी. बोडखे,संदीप पगारे,नानाभाऊ वाडेकर,अर्जुन औटे,संभाजी जगताप,आण्णासाहेब लांबडे, संजय धायगुडे,युवराज खटके
प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डाॕ.डी.बी.राऊत,डाॅ.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ,प्राचार्य डाॕ.चंद्रकात गोसावी आदी मान्यवरांनी समक्ष आणि दूरध्वनीवरून शुभेच्छाचा वर्षाव केला.यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यात सभापती सौ. सुवर्णाताई लांबरुड,सरपंच सावता ससाणे,उपसभापती पांडुरंग नागरगोजे,नवनाथ सानप,अशोक साळवे,अशोक दहिफळे,शिवाजी सुरवसे, पांडुरंग गावडे,हरिभाऊ जंजीरे,
अड.रत्नदीप निकाळजे, राजपाल शेंडगे,सुरेश राख, देविदास शेंडगे,दादा जगताप, बबन आणेराव,माऊली पानसंबळ,संजय विधाते,इंजि. बाळासाहेब भुकन,बबन सांगळे,सुदाम झिंजुर्के,बबन औटे यांनी आपले मनोगत  व्यक्त केले.
  पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की,कोणताच माणुस आयुष्यभर आमदार राहत नसतो आपल्या सत्तेच्या काळात आपण कीती  गोरगरीब,दुर्बलांच्या उपयोगी पडतो. आहो गाय गोठा कुणाला देता? वैयक्तिक लाभांच्या  योजना तोंड पाहुन मंजुर करु नका,गरीबांना व गरजुंनाच द्या..असा सल्ला देत जनतेने कायद्याच्या इधाराने न्याय मिळवुन घ्या.कोणी अन्याय करत असेल तर कायदा दाखवा.वेळप्रसंगी आक्रमक व्हावे.आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्याला असतांना पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी नाकारली.अपक्ष निवडणुक लढलो.आपण प्रामाणिकपणे कामही केले. मात्र यश आले नाही. ” झाले गेले सोडून द्या ” आणि येणा-या जि.प.व पं.स. निवडणुकीत तन,मन,धनाने स्वबळावर सर्व जागा लढविणार आहोत, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही धोंडे म्हणाले.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,सध्याची राजकारणाची परिस्थिती जुन्या काळातील तमाशातील कलाकारासारखी झालेली आहे.राजकारणात
एकमेकांचे विरोधक जरी असलोत तरी दोस्ती तुटली नाही.सध्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना किंमत नाही.
 युवानेते डॉ.अजयदादा धोंडे म्हणाले की,धोंडेसाहेबांनी
आजपर्यंत प्रामाणिकपणाचे राजकारण केलेले आहे परंतु आता ” आरे ला कारे ” म्हणण्याची तयारी कार्यकर्त्यांना ठेवावी लागणार आहे.युवकांनी निर्भिड व्हावे आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे
राहणार आहोत.
चौकट
——-
वेगळा निर्णय घ्यावा
लागणार आहे
—- भीमराव धोंडे
———————-
  आपण विधानसभा निवडणुक अपक्ष लढविल्यामुळे भाजपाने आपल्याला पक्षातून काढले
आहे परंतु आपण मंत्री पंकजाताई मुंडे यांना भेटणार आहोत.जर आपला विचार झाला नाही तर आपण
वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले.
चौकट
——–
आष्टी-पाटोदा -शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी फळ वाटप,रक्तदान शिबीरे, साहेब चषक क्रिकेट स्पर्धा, रूग्णालयात फळ वाटप, विविध शाळेत व महाविद्यालयात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा,निंबध स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन,लिंबु चमचा, धावणे स्पर्धा,कबड्डी स्पर्धा , क्रिकेट स्पर्धा आदि विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. आंनद शैक्षणिक संकुल गंगाईनगरातील सर्व विद्यालये व महाविद्यालये यांच्या संयुक्त रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केले. ठिकठिकाणी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.तर माजी आ.भीमराव धोंडे यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला तर काही मान्यवरांनी फोनवरुन, सोशल मीडियावरून, आष्टी येथील निवासस्थानी उपस्थित राहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
———————
 आष्टी विधानसभा मतदार संघाचे चार टर्म आमदार राहिलेले शेतकरी शिक्षण  संस्थेचे संस्थाध्यक्ष शिक्षण महर्षी लोकनेते माजी आ. भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवस प्रसंगी मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांनी प्रत्यक्ष भेटून भीमराव धोंडे यांचा वाढदिवस साजरा केला.
मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच त्यांच्या समर्थक चाहत्यांनी शुभेच्छासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी केली होती.त्यानंतर मोरेश्वर मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्यांना बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता.छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर या कृषी महाविद्यालय व महेश आर्युवेद काॕलेज ॲन्ड हाॕस्पीटलमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यावेळी सभागृहामध्ये चाहत्यांकडून सत्कार स्वीकारले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे या वाढदिवसाच्या समारंभाला युवक व प्रोढ कार्यकर्ते,  सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.यावेळी संचलन प्राचार्य बाळासाहेब खेमगर यांनी तर आभार दादा जगताप यांनी मानले.
————————-
Back to top button