बीड

ल. ना. होशिंग विद्यालयात एन.एम.एम.एस. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

ल. ना. होशिंग विद्यालयात एन.एम.एम.एस. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शिक्षक-पालक सभा उत्साहात पार

जामखेड प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळेत जादा तासिका, स्पर्धा परीक्षा वर्ग, विकास प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक-पालक सहकार्यातून विद्यार्थ्यांची प्रगती कशी साधता येईल, याबाबत प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी मार्गदर्शन केले.
दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक छात्रवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस.) मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शिक्षक-पालक सभा उत्साहात पार पडली.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माननीय बाळासाहेब पारखे होते तर प्रमुख पाहुणे माननीय प्रसाद पोतदार हे होते.
यावेळी हनुमंत वराट यांनी ऑनलाईन व ऑफलाइन जादा तासिका, सराव परीक्षा व पालकांनी घ्यावयाची दक्षता तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व आणि उन्हाळी शिबिरांविषयी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिक्षक-पालक सभेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, ऑनलाईन तासिका आणि सर्वांगीण विकासावर चर्चा झाली. पालक प्रतिनिधी श्रीम. जयश्री वारे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनीही सक्रिय भूमिका बजावावी, असे मत मांडले.
या कार्यक्रमासाठी हर्षल डोके( वकील), उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, ज्येष्ठ अध्यापक भरत लहाने,मुकुंद राऊत, रोहित घोडेस्वार, आदित्य देशमुख, पूजा भालेराव, स्वप्नाली घाडगे, शिक्षक प्रतिनिधी संगीता दराडे, विशाल पोले, उमाकांत कुलकर्णी, साई भोसले, बबन राठोड आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्यालयाचे‌ मराठी विभाग प्रमुख व एनसीसी ऑफिसर अनिल देडे यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम. सुप्रिया घायतडक यांनी केले.

Back to top button