बीड

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार-आ.सुरेश धस

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार-आ.सुरेश धस

आष्टी ( प्रतिनिधी)
सुरत ते चेन्नई हा राष्ट्रीय ग्रीन फिल्ड महामार्ग आष्टी तालुक्यातील 19 गावांमधून जात असून या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बहुमोल किमतीच्या जमिनी भूसंपादित करण्यात येणार असल्याने या संपादित जमिनींवरील फळबागा, वृक्ष लागवड, घरांचे बांधकाम, पत्रांचे शेड्स, विहिरी खोदकाम या सर्व संपत्तीचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करून शेतकऱ्यांना महामार्ग प्राधिकरणाने जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी आपण जिल्हाधिकारी बीड यांच्याशी आणि आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी याबाबतच्या प्रशासन आणि संबंधित शेतकरी त्यांचे संयुक्त बैठकीमध्ये बोलताना दिली
आज या महत्वपूर्ण विषयाच्या बैठकीसाठी पाटोदा विभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख आणि राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार आणि 19 गावातील संबंधित शेतकरी हे उपस्थित होते
आष्टी तालुक्यातील नांदूर ते पारगाव जोगेश्वरी या दरम्यानच्या 19 गावांमधून हा राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्ग जात असून सुमारे 38 किलोमीटर अंतराचा असून त्यासाठी 200 ते 225 हेक्टर्स जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे या महामार्गाचे ऑगस्ट 20 22 मध्ये ड्रोन सर्वेक्षण झाले त्यानंतर सप्टेंबर 23 मध्ये नोटिफिकेशन प्रकाशित होण्याच्या दरम्यान या महामार्गावरील असेट्स मध्ये वाढ झाली आहे असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केला असताना संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करताना अनेक ठिकाणी चुका झाल्या असून फळबागांचे मोघम स्वरूपात मूल्यांकन करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे असे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मूल्यांकनाबाबत उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीने विचार करण्यात येणार असून रेडी रेकनर सह प्रचलित मूल्यदर याचा देखील विचार होणार असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याविषयी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला नसला तरीही शेतकऱ्यांना आतापर्यंतचे व्याज देण्याचा प्राधिकरणाचा विचार असल्याचे सांगितले आष्टी तालुक्यातील नांदूर, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, पुंडी, शिरापूर, निमगाव चोभा,धिर्डी, केळसांगवी, खानापूर चिखली वाळुंज पारगाव जोगेश्वरी या गावातील शेतकऱ्यांनी आपापली निवेदने सादर केली असून त्यावर सारासार विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला घेण्याबाबत आपण जिल्हाधिकारी बीड यांचे पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत चर्चा करून असे आश्वासन आ. सुरेश धस यांनी या गावातील शेतकऱ्यांना यावेळी दिले

Back to top button