बीड

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण – प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण – प्राचार्य डॉ. सदाशिव सरकट

गेवराई (प्रतिनिधी) जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतिने यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
   या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे म्हणाले की यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राचा पाया त्यांनी १९६० च्या दशकात घातला व त्यामध्ये कृषी व औद्योगिक वाढ परस्परांना पूरक व पोषक ठरेल हे सूत्र त्यांनी ठेवले होते. डॉ. धनंजयराव गाडगीळांसारख्या अर्थतज्ज्ञांना बरोबर घेऊन, सहकारी तत्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया घातला. त्यामध्ये कृषी व औद्योगिक क्षेत्रामधील समतोल किती महत्वाचा असतो हे त्यांनी ओळखले होते. त्याची आठवण १९८६ मध्ये भरलेल्या जागतिक अर्थशास्त्र परिषदेच्या निमित्ताने झाली. कारण, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील समतोल हाच विषय परिषदेसाठी निवडण्यात आला होता. यशवंतरावांनी जी गोष्ट १९६० च्या दशकात ओळखली होती व ज्यासाठी कृषी, औद्योगिक विकासाचे प्रारूप महाराष्ट्रासाठी निवडले होते, त्याची जाणीव १९८६ मध्ये जागतिक पातळीवरील अर्थशास्त्रज्ञांना झाली. यातच यशवंतरावांची दूरदृष्टी लक्षात येते.यशवंतरावजींनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक धोरणाचा फक्त पायाच घातला नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण केले. गुणग्राहक वृत्तीने प्रत्येक क्षेत्रातील ‘उत्तम’ माणसे हेरली. गुणी माणसांचे, कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची ओळख एक प्रगतिशील राज्य म्हणून निर्माण झाली आहे. आधुनिक व्यवस्थापनामधील ‘योग्य कामांसाठी योग्य व्यक्तींची निवड’ हे सूत्र यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी वापरले. आधुनिक काळात Good Governance हा परवलीचा शब्द झाला आहे. परंतु, भविष्याचा वेध घेणाऱ्या यशवंतरावांनी त्याचा पाया महाराष्ट्रात १९६०-७० च्या दशकातच घालून ठेवला होता. हे कृतज्ञतापूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अनेक क्षेत्रांत घेतलेल्या पुरोगामी निर्णयांचा स्वीकार कालांतराने देशपातळीवर करण्यात आला व महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारूप (Model) देशपातळीवर अप्रत्यक्षपणे स्वीकारले गेले असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा. डॉ. रमेश रिंगने यांनी केले तर प्रास्तविक प्रो. डॉ. संतोषकुमार यशवंतकर आभार प्रा. कलंदर पठाण यांनी मानले.
 कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांने करण्यात आली.
याप्रसंगी प्राध्यापक प्राध्यापिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button