बीड
कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अमरसिंह पंडित

कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अमरसिंह पंडित
आनंदवाडीचे सतिष चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
गेवराई, दि. 11 (प्रतिनिधी)ः- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दलचा विश्वास जनसामान्यात वाढत आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व समावेशक विकास कामे होत आहेत. याच जोरावर ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. नवीन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या माध्यमातून आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, कार्यकर्त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत मौजे आनंदवाडी येथील सतीश चव्हाण यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. शुक्रवार, दि.11 जुलै रोजी तलवाडा जिल्हा परिषद गटातील मौजे आनंदवाडी येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सतीश चव्हाण यांनी त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण, रामेश्वर चव्हाण, अनिल चव्हाण, बालाजी गायकवाड, जयराम गायकवाड, सखाराम चव्हाण, भागवत चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, जयराम नरवडे, राहुल चव्हाण, दादा गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, प्रदीप तांगडे, गहीनाथ तांगडे, रामेश्वर तांगडे, तुकाराम चव्हाण, भास्कर चव्हाण, अविनाश गायकवाड, गणेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, गणेश चव्हाण, अरविंद पवार, बळीराम चव्हाण, संतोष हातागळे, किशोर हातागळे, भैय्या हातागळे, अनिल हातागळे, रमेश हातागळे, विजय हातागळे, भीमा हातागळे, भरून हातागळे, जितेंद्र हातागळे, विजय हातागळे आदी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये आनंदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी सभापती आसाराम मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक आतकरे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गजानन काळे, माजी सरपंच विष्णू हत्ते, मनोज हजारे, सरपंच रामप्रसाद चाळक, विठ्ठल चव्हाण, रणजीत घुंबार्डे, सरपंच राधेश्याम चक्कर, बंटी सौंदरमल, लहू लोखंडे, विजय सुतार, नजीम कुरेशी, प्रकाश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.



