जामखेड येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाकडून अभिवादन

जामखेड येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाकडून अभिवादन
जामखेड :जामखेड शहरातील महाराष्ट्र राज्य,विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात एकात्म मानवतावादाचे प्रणेते, महान तत्त्वचिंतक व अंत्योदयाचे जनक, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. ११ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद,जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,उपाध्यक्ष प्रविण होळकर, ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे,बांधकाम विभाग समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार,युवा नेते बाजीराव गोपाळघरे, मोहन मामा गडदे, अनिल यादव,उद्योजक गोरख घनवट, मनोज कुलकर्णी, सुंदरदास बिरंगळ, डाॅ.अल्ताब शेख,नगरसेवक हर्षल काळे, डॉ.अशोक बांगर, माऊली अंदूरे, राहुल चोरगे,अनिल श्रीरामे, बाळासाहेब गायकवाड आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



