बीड
चकलांबा गणातून पंचायत समिती महेबुब कादरी यांनी निवडणूक लढवावी -शेख तय्यब

चकलांबा गणातून पंचायत समिती महेबुब कादरी यांनी निवडणूक लढवावी -शेख तय्यब
गरजू सहकारी गोरगरिबांचे कैवारी मदतगार म्हणजे महेबुब कादरी होय
कोळगाव बाळासाहेब घाडगे – गेवराई तालुक्यातील महत्त्वाचे चकलांबा जि प गट हा ओबीसी व चकलांबा पंचायत समिती गण हा सर्वसाधारण करिता आहे. चकलांबा परिसरात सर्व जाती धर्माच्या एक महत्त्वाचे मानणारे नेते गोरगरिबांच्या सुखा दुःखात नेहमी धावून येणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून महेबुब कादरी असून त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी शेख तय्यब केली आहे.
गेवराई तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले असून इच्छुकांनी आपल्या आपल्या मतदारसंघात मोर्चे बांधणी ला सुरुवात केली आहे. त्यातच गेवराई तालुक्यातील महत्त्वाचा मानणारा चकलांबा जि प गट हा ओबीसीला सुटला आहे व चकलांबा पंचायत समिती गण हा सर्वसाधारण करिता आहे. दरम्यान चकलांबा सर्कलमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध आदी धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून धनगर वंजारी मराठा, माळी या समाजाची मतदार संख्या जास्त आहे. यामध्ये मुस्लिम समाजाचे सर्व समावेशक परिचय असलेले महेबुब कादरी आहे. चकलांबा सर्कलमध्ये स्वच्छ प्रतिमेचा मजबूत पकड असणाऱ्या एक महत्त्वाचे मानणारे नेते गोरगरिबांच्या सुखा -दुःखात नेहमी धावून येणारे केव्हाही गरजू सहकारी मित्र परिवार नागरिकांना उपस्थित राहुन गोरगरिबांचे कैवारी मदतगार म्हणजे महेबुब कादरी होय. आणि ते नेहमीच जनसेवेत असतात. जनता त्यांना बाबा म्हणत आमचे बाबा महेबुब कादरी उर्फ(अमर टेलर)यांनी पंचायत समिती लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.चकलांबा सर्कल मध्ये यांचा तगडा जनसंपर्क व त्यांना मानणारा मोठा वर्ग असून तालुक्यातील आजी माजी आमदार नेत्यांनी अश्या कार्यकर्त्यांना बळ देवून जनतेला चांगले प्रतिनिधी द्यावे. यामुळे परिसरात खूप फायदा होवू शकतो. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तय्यब गुलाब शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.



