बीड
ब्रह्माकुमारीज बीड यांच्या द्वारे ‘स्वास्थ्य, समृद्धि आणि खुशीचे रहस्य’ विशेष कार्यक्रम

ब्रह्माकुमारीज बीड यांच्या द्वारे ‘स्वास्थ्य, समृद्धि आणि खुशीचे रहस्य’ विशेष कार्यक्रम
समाजसेवेत कार्यरत ९० महानुभावांचा सन्मान
बीड प्रतिनिधी:-प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था असून आजतागायत समाजात आध्यात्मिक जागृती, नैतिक मूल्यांचा प्रसार आणि तणावमुक्त जीवनासाठी कार्यरत आहे. ही संस्था २१ प्रभागांद्वारे (Departments) कार्यरत आहे, ज्यामध्ये समाज सेवा प्रभाग हा एक भाग आहे. ब्रह्माकुमारीज बीड सेवाकेंद्र यांच्या वतीने “स्वास्थ्य, समृद्धि आणि खुशीचे रहस्य” या विषयावर भव्य आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजसेवेत योगदान देणाऱ्या ९० महानुभावांचा सन्मान करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राजयोगी बी.के. प्रो. ई. व्ही. गिरीश (मुंबई) असून ते स्वास्थ्य, समृद्धी आणि आनंद यामधील आध्यात्मिक संबंध स्पष्ट करतील. हा कार्यक्रम बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत, सम्राट लॉन्स, उत्तम नगर, कॉलनी रोड, बीड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे होणार आहे.या सोहळ्यास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यात मा. श्री. अंबादासजी दानवे (विरोधी पक्ष नेते, विधान परिषद), मा. श्री. बजरंग बप्पा सोनवणे (खासदार, बीड), मा. श्री. संदीप क्षीरसागर (आमदार, बीड), मा. श्री. विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी, बीड), मा. श्री. नवनीत कावत (पोलीस अधीक्षक, बीड), मा. श्री. जयदत्त अण्णा क्षीरसागर (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि डॉ. ईशा अग्रवाल (मिस इंडिया, अभिनेत्री, मुंबई) यांचा समावेश आहे.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या समाज सेवा प्रभागाच्या माध्यमातून करण्यात आले असून, या उपक्रमाचा उद्देश समाजसेवकांना प्रोत्साहन देणे आणि सर्वांसाठी अंतरिक शांती, आरोग्य व आनंदाचा संदेश पोहोचवणे हा आहे.



