ना.अजितदादांकडून बीडकरांची अपेक्षापूर्ती आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीनुसार बीड शहरातील रस्त्यांना २२ कोटी रुपयांचा निधी

बीड, दि.२३ (प्रतिनिधी) ः- ना.अजितदादा पवार यांनी पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर जिल्ह्यात विकासाचे अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नगर पालिका निवडणुकीत अजितदादा पवार यांनी बीडकरांना विकासावर मत मागितले आणि बीडच्या सुजान जनतेनेही त्यांच्या शब्दाला मान दिला. आता अजितदादा पवार यांनीही बीडकरांची अपेक्षापूर्ती करण्यास सुरुवात केली आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील जनतेचे जिव्हाळ्याचे रस्त्याचे प्रश्न ना.अजितदादा पवार यांच्यासमोर मांडल्यानंतर शहरातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि इतर विकास कामांसाठी २२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून हाती घेण्यात आलेली ही विकास कामे लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. बीड शहरातील विकास कामांना निधी मंजुर केल्याबद्दल नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल यांच्यासह शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी ना.अजितदादा पवार व आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते बशीरगंज चौक पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १२५ लक्ष रु., जालना रोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – २०० लक्ष रु., जिजामाता चौक ते स्पोर्टस् कॉम्प्लेक्स पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १०० लक्ष रु., राजुरी वेस ते कबाड गल्ली, माळीवेस पोलीस चौकीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – २०० लक्ष रु., बार्शी रोड ते लेंडीनाला पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – २०० लक्ष रु., बीड शहरातील लेंडीनाला ते कौसर चौक ते बिंदुसरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १२५ लक्ष रु., बारकुल हॉस्पिटल ते तहसिल कार्यालया पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ९० लक्ष रु., नरसोबा नगर ते माऊली हॉस्पिटलपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १५० लक्ष रु., चक्रधर नगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १०० लक्ष रु., कॅनॉल रोड ते शिंदेनगर फेज १ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १०० लक्ष रु., खंडेश्वरी देवी मंदिर ते खिंड रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – १०० लक्ष रु., कॅनरा बँक कॉलनी येथे हनुमान मंदिरा पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ७० लक्ष रु., प्रेरणा कॉलनीमध्ये श्री.अकोलकर यांचे घर ते पिठाच्या गिरणी पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ६० लक्ष रु., हनुमान नगर येथे श्री.हातागळे यांचे घर ते श्री.गालफाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ६० लक्ष रु., हनुमाननगर येथील समाजमंदिर ते श्री.जोगदंड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ६० लक्ष रु., बलभीमनगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ६० लक्ष रु., नगर रोड ते ऑफिसर कॉलनी पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ६० लक्ष रु., जुना धानोरा रोड ते श्री.काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ५० लक्ष रु., जुना धानोरा ते पिंगळे डेअरी फार्मपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ५० लक्ष रु., पवनसुत मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे. ५० लक्ष रु., प्रियदर्शनी बालउद्यानच्या बाजूला वाहनतळ बांधकाम करणे – ५० लक्ष रु., शिवाजी नगर येथे श्री.सतिष जाधव ते श्री.शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे – ५० लक्ष रु., नागसेन बुध्दविहार नुतणीकरण करणे – २५ लक्ष रु., विविध ठिकाणी सोलार मिनी हायमास्ट बसविणे – १०० लक्ष रु.
![]()



