संपादकीय

ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना अमेरिकेकडून ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर

 

महाराष्ट्राचा झेंडा अटकेवर रोवणारे तथा युनोस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला होता. रणजितसिंह डिसले गुरूजींची शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घ्यावी लागली. त्यातच आता अमेरिकेकडून डिसले गुरूजींना प्रतिष्ठित समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

पीस इन एज्युकेशन या विषयामध्ये अमेरिकेत संशोधन करण्यासाठी रणजितसिंह डिसले यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित आणून शैक्षणिक संशोधन करण्याची संधी दिली जाते.

जगातील अशांत देशांमध्ये भारत-पाकिस्तान, इराण-इराक, अमेरिका-उत्तर कोरिया एकमेकांविरोधात द्वेष भावना उत्पन्न होत असल्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा उपक्रम हाती घेतला. अहिंसेच्या विचाराच्या प्रचार प्रसाराचं काम ते करत आहेत. याच विषयावर संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असं डिसले गुरूजींनी सांगितलं आहे.

Back to top button