संपादकीय

पालकमंत्र्यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, नितेश राणेंचा उदय सामंतांना इशारा

 

राज्यत आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष विशेष करून राणे कुटुंबीय संपूर्ण महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून आले आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचा विकास निधी परत केला जात असल्याने ही बैठक वादळी ठरणार आहे. जिल्हा नियोजनचा निधी नियमबाह्य पध्दतीने वितरित करणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नातेवाईकांचा जिल्ह्यातील कारभारात ढवळाढवळ, जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, जिल्ह्यात अनधिकृत व नियमबाह्य काम सुरू असल्याचे आरोप करत आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख केला.

तसेच पालकमंत्र्यांना घाम फोडल्याशीवाय “तो काय” रत्नागिरीला परत जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दोन वेळेचा डब्बा घेऊन नियोजन बैठकीत यावं. फुलपाखरासारखं आलं आणि गेलं तसं काही होणार नाही, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेय. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा नियोजन बैठक होत आहे. त्यात ही बैठक वादळी होणार असल्याचे संकेत आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी आता संपत आहे. यामुळे या नियोजन समितीमध्ये सदस्य असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची ही अखेरची नियोजन बैठक आहे. जानेवारीमध्ये झालेल्या सभेमध्ये आगामी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता.

Back to top button