राजकीय

पेट्रोल ७० रुपयांवर नेण्यास काँग्रेसला ७० वर्षे लागले, संघी लोकांनी ७ वर्षात १२० रुपये केले

 

नवी दिल्ली | एकीकडे कोरोना संसर्गामुळे सामनात नागरिक हतबल झालेला असताना दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकात हतबल झाला आहे त्यात दिवाळीपूर्वीच पेट्रोल दरवाढीचा भडका झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. या वाढत्या इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, बॉलिवूडचा अभिनेता केआरकेनेही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

इंधन दरवाढीवरुन समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह म्हणाले की, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत लखनौमध्ये ९३७.५० एवढी झाली आहे. श्रीमंत असो किंवा गरीब आता कुणालाही सबसिडी मिळत नाही. पंतप्रधानांनी ओरडू ओरडून ग्रामीण भागात गॅस दिल्याचं सांगितलं. मात्र, आज ग्रामीण भागातील 99 टक्के जनता पारंपरिक स्त्रोतचा वापर करत आहे. त्यामध्ये, शेणाच्या गौऱ्या आणि वाळलेल्या लाकडांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनीही देशातील वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधात मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला जवळपास ७० वर्षे लागली होती, पेट्रोलचे दर ७० रुपयांवर नेण्यासाठी. पण, राष्ट्रवादी आणि संघी लोकांनी ७ वर्षातच १२० रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. मग हा कसला राष्ट्रवाद? असा सवालही श्रीनिवास यांनी विचारला आहे.

Back to top button