📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महाशिवरात्री धाकटी पंढरीत श्री क्षेत्र नारायण गडावर भाविकांची मांदियाळी.हर हर महादेव गजरात दर्शन..

महाशिवरात्री धाकटी पंढरीत श्री क्षेत्र नारायण गडावर भाविकांची मांदियाळी.हर हर महादेव गजरात दर्शन..
   कोळगांव, दि.१५ (बाळासाहेब घाडगे  ):- धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण गडावर दि.१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकभक्तांनी पहाटे पासून दर्शनासाठी गर्दी केल्याने संपुर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मठाधिपती महंत हभप शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.
      बीड जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र नारायण गडावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराबरोबर महादेवाची स्वयंभु शिवलिंग आहे. दर महिन्याच्या एकादशीच्या आणि महाशिवरात्री निमित्ताने गर्दी होते. दरम्यान दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या महाशिवरात्री निमित्ताने गावगावातील महादेवाची शिवालय गजबजून गेली होती. श्री क्षेत्र नारायण गडाच्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी अगदी सकाळपासुनच गडाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली होती. यावेळी मठाधिपती महंत हभप शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. याचबरोबर पंचक्रोशीतील जवळच्या गावातील नागरिक, महिला, मुली व भाविकांनी चालत जाऊन दर्शन घेणे पसंत केले. गड परिसरात हरहर महादेव, जय-जय शंकरा या जयघोषाने संपुर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. तर यावेळी येणाऱ्या भाविकभक्तांंसाठी मठाधिपती हभप शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानच्या वतीने पाणी, दर्शन रांगा, पार्किंग व्यवस्था, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी गडावर भव्य वारीचे स्वरूप दिसून आले. नगद नारायण महाराज की जय, हर-हर महादेवाच्या नाम घोषाने मंदिर परिसर दणाणले होते.
————-
Back to top button