बीड

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासात पालकांची महत्वाची भूमिका – सरपंच शरद जगताप

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासात पालकांची महत्वाची भूमिका – सरपंच शरद जगताप

उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार

एनएमएमएस,शिष्यवृत्ती,मंथन,बी.टी.एस परिक्ष

जामखेड प्रतिनिधी: विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासात पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी कायम जागृत राहून त्यांच्या विकासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धे च्या युगात टिकण्यासाठी पालकाची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन घोडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक शरद जगताप यांनी व्यक्त केले. तर आज जामखेड तालुक्यात स्पर्धा परीक्षेत मुलांनी जे घवघवीत संपादन केले आहे. त्यात शिक्षकांचे योगदान यश मोलाचे असल्याचे पालक महादेव भोंडवे यांनी सांगितले व शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.

पंचायत समिती चे माजी गटशिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य मानले असून गुणवत्तावृद्धीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची प्रभावी तयारी करून घेतली आहे.

याच अनुषंगाने आज दिनांक ५ जून २०२६ रोजी जामखेड तालुका दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरासह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. घोडेगाव (ता. जामखेड) येथील यश महादेव भोंडवे याने इयत्ता आठवीत विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

यश भोंडवे याने एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) मध्ये १७९ पैकी १४७ गुण मिळवून त्याने श्री नागेश विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला असून तो शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २५४ गुण मिळवत त्याने विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय इयत्ता आठवीतील मंथन, बी.टी.एस. आणि लक्षवेध या परीक्षांमध्येही त्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तसेच शहरातील कोल्हे मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक केशवराज कोल्हे यांचे चिरंजीव शंभुराजे केशवराज कोल्हे (इयत्ता आठवी, शिष्यवृत्ती परीक्षा : २७२ गुण), तसेच शिवकुमार केशवराज कोल्हे (इयत्ता पाचवी, शिष्यवृत्ती परीक्षा : २७२ गुण), प्रताप पवार यांची कन्या शिवज्ञा पवार, राज्यस्तरीय गुणांकन प्राप्त मंथन, बी.टी.एस. आणि लक्षवेध परिक्षेत यश तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेवाडी येथील राजीव मडके यांचे माजी विद्यार्थी दादाहरी सुनील तोंडे (इयत्ता नववी, एनएमएमएस : १२१ गुण),यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल व शेखर घुमरे यांची कन्या प्रांजल शेखर घुमरे इयत्ता सहावी साठी सैनिकी स्कूल, विजापूर येथे निवड
झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.या वेळी सरपंच शरद जगताप, शिक्षक बँकचे विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते, आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण, शिक्षक नेते विनोद सोनवणे, केशवराज कोल्हे, राजीव मडके, संतोष धनगर,शिक्षणप्रेमी महादेव भोंडवे, बाळासाहेब कांबळे, विनोद जगताप तसेच श्री नागेश विद्यालय,येथील वर्गशिक्षक संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button