बीड
समाजातील दातृत्व हातांचा शोध घेवून अनाथांना शालेय साहित्य वाटप

बारा वर्षांपासून सुभाष काळे यांचा छत्र हवलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटचा यज्ञ सुरू
उमापुर/प्रतिनिधी
जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे उमापुर व परिसरातील छत्र हरवलेल्या अनाथ मुलांना आदर्श शिक्षक सुभाष काळे यांच्या संकल्पेतून गेेल्या बारा वर्षांपासून छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्षभर पुरेल एव्हढे शालेय साहित्य वाटपाचा यज्ञ अखंडपणे सुरू असून बाराव्या वर्षीही तब्बल ९० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दि. २७ जुन रोजी जिल्हा परिषद शाळा उमापुरच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनमंदिर प्रकल्पाचे माधव पवार, सारिखाताई पवार समाजसेवक राजकुमार आग्रवाल, डीवाएसपी अनंतकुमार कुलकर्णी लाभले होते. तर विशेष उपस्थिती उमापुरचे सरपंच किरण आहेर, सेवानिर्वत्त शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत आटोळे यांची होती.
शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमापुजनाने झाली.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदर्श शिक्षक सुभाष काळे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की समाजातील दातृत्व हातांचा शोध घेवून अनाथांना शालेय साहित्याचे काम गेल्या १२ वर्षांपासून आपण करत आलेलो आहे.अनेकदा आवश्यकतेपेक्षा पैसा कमी पडतो त्यावेळी मी माझ्या पगारातून हे काम पुर्णत्वास घेवून जात आलेला आहे. सुरूवातीच्या काळमध्ये लोकांमध्ये जागृती नव्हती मात्र आज दाते हे स्वत:हून मदत जाहीर करत असल्याचे समाधान वाटते. यावेळी शाळेतील आदर्श शिक्षक भगवान फुंदे यांनीही आपल्या मनोगतातून काळे सर यांचे भरभरून कौतूक केले. आपल्या परिसरात अशा अनाथ व छत्र हरवलेल्या मुलांना गेल्या बारा वर्षापासून शालेय साहित्य वाटप होत असताना अनेकदा मला यामध्ये सहभाग घेण्याचा योग आल्याचे समाधान येथील सरपंच किरण आहेर यांनी बोलून दाखवला. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. मनमंदिर प्रकल्पाचे सारिखाताई पवार यांच्या अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर ९० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एव्हढे साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले अण्णासाहेब पवार, केंद्रप्रमुख दिलीप नरोटे, मुख्याध्यापक भक्तराज पौळ, महादेव औटी,आप्पासाहेब महानोर, मुख्याध्यापक ठाकुर, मुख्याध्यापक वळवी,मुख्याध्यापक जुलाह, उमापुर सज्जाचे मंडळ अधिकारी शिरीष डांगे, विनोद कापसे, मऊली पिंगळे, काकासाहेब औटी, विष्णु राठोड, अशोक आहेर, भक्तराज आहेर, पिनुशेठ गाभुड, पत्रकार अमिनभाई शेख, सुरेश आहेर, कृष्णा सामजे,भारत चव्हाण, सुनिल अंदुरे, प्रमोद पवार यांची उपस्थित होती. कार्यक्रमास शाळेतील सर्वच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
९० विद्यार्थ्यांना ४० हजारांचे साहित्य
उमापुर व परिसरातील छत्र हरवलेल्या अनाथ ९० मुलांना जवळपास ४० हजारांचे शालेय साहित्याचे वाटप छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सुभाष काळे हे अन्न धान्य बँकेच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी सातत्याने काम करत असताना अनाथ व छत्र हरवलेल्या मुलांसाठीही ते आग्रही असतात. यावेळी समाजसेवक सुभाष काळे यांचे मान्यवरांनी भरभरून कौतूक केले.