बीड

साकेश्वर मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भक्ती आणि स्वच्छतेचा संगम – माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर

साकेश्वर मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भक्ती आणि स्वच्छतेचा संगम – माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर

जामखेड (प्रतिनिधी)- २६ मेसाकेश्वर मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भक्ती आणि स्वच्छतेचा संगम आहे.असे प्रतिपादन माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी केले.

भारतीय जनता पार्टी तालुका (ग्रामीण) यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर महाराज मंदिर, साकत येथे आज सोमवार दिनांक २६ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता महाआरती व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिसर स्वच्छतेबरोबरच भक्तिभावाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरती करण्यात आली.

या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाप्पुराव ढवळे, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, माजी सरपंच कांतीलाल वराट, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक कोल्हे, मिलन घोडेस्वार, बळीराम कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, महारुद्र नेमाने, सोसायटी संचालक विनोद मुरुमकर , दिलीप घोलप, ह.भ.प. उत्तम (महाराज) वराट, तसेच ईश्वर मुरुमकर, नागराज मुरुमकर, हरीभाऊ मुरुमकर, मोहन आडसुळ, दत्तात्रय वराट, वैभव मुरुमकर, दादा मोहिते, महादेव वराट, अमोल सावकार वराट, विष्णूपंत वराट, प्रकाश वराट, भिमराव टेकाळे, प्रकाश मुरुमकर, प्रतिक शेठ मुरुमकर, पियुष मुरुमकर, दीपक आडसुळ, भागवत मुरुमकर, संदीप मुरुमकर, राजाभाऊ मुरुमकर, बाळासाहेब वराट, रमेश आडसुळ, भास्कर आडसुळ, सचिन मोहिते, किशोर घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे समाजात स्वच्छता व सांस्कृतिक जाणीवेचा संदेश देण्यात आला.

Back to top button