1984 साली केलेल्या अतिक्रमणामुळे बोरखेडचे बिनविरोध सरपंच फुलाबाई रोहिदास पवार यांना जिल्हाधिकारी बीड यांनी अपात्र केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की बोरखेड सरपंचा विरोधात माजी सरपंच शहादेव हिंदोळे यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ज 3 व 16 अन्वये तक्रार दाखल केली होती. बोरखेडचे सरपंच फुलाबाई रोहिदास पवार यांनी गट नंबर 197 मध्ये सन 1984 साली अतिक्रमण केले असून तेव्हापासून सदरील जमीन वहीती करत आहे तसेच 1992 93 मध्ये अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे देखील एडवोकेट केस पंडित यांनी निदर्शनास आणून दिले त्यामुळे अतिक्रमण प्रकरणात बोरखेड सरपंच फुलाबाई रोहिदास पवार यांना अपात्र करण्याचे आदेश माजी जिल्हाधिकारी बीड यांनी दिले आहेत