ज्येष्ठ होमगार्ड राजू जाधव यांचे निधन

ज्येष्ठ होमगार्ड राजू जाधव यांचे निधन
जामखेड प्रतिनिधी : जामखेड येथील होमगार्ड पथकातील ज्येष्ठ होमगार्ड सार्जंट राजू हरिभाऊ जाधव यांचे रविवार (दि. ७ जून २०२६) रोजी सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.
राजू जाधव यांनी ३६ वर्षे होमगार्ड दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावली. शांत, मनमिळाऊ आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांनी सहकारी तसेच नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतले होते.ट्राफीक सुरळीत करण्यासाठी त्यांचा मोठा हातखंडा होता.त्यांच्या निधनाची बातमी समजताच होमगार्ड दलासह जामखेड शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
जाधव यांच्या पश्चात आई ,बहीण,मुलगा,सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रविवार रोजी दुपारी जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरातील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी होमगार्ड दलाचे माजी तालुका समादेशक डॉ.सुरेश काशिद, तालुका समादेशक नागेश घायाळ,पलटन नायक अकबर शेख, राष्ट्रवादी चे नेते राजेंद्र कोठारी, मनसे नेते प्रदीप टाफरे, शिवसेना तालुकाप्रमुख(कर्जत)बापूसाहेब नेटके,सामाजिक कार्यकर्ते प्रा.लक्ष्मणराव ढेपे आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी काशिनाथ अंधारे,नगरसेवक राजेंद्र गोरे, आदिवासी नेते प्रकाश काळे,माजी नगरसेवक अमित जाधव, राजेश वाव्हळ, दिगंबर अष्टेकर,धनराज राजगुरू,अरुण डोळस, बाळासाहेब नेटके, सुर्यकांत माने,संजय साळुंके, प्रताप पवार यांच्या सह होमगार्ड दलातील सैनिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाधव यांच्या निधनाने जामखेड होमगार्ड दलाने एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय व अनुभवी सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.



