राजकीय

जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली

 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारखाना घोटाळा प्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केल्यानंतर सोमय्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना आव्हान दिलं होत. तुमच्यात हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण जाहीर करावे असे सोमय्या यांनी म्हटलं होत.

यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन या कारखान्याची संपूर्ण माहिती माध्यमांसमोर मांडत सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर दिल आहे. ६५ साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत . तसेच ६४ सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतल्याची आकडेवारी त्यांनी माध्यमांसमोर मांडली.

तसेच पुढे हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर सुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

Back to top button