लिंबागणेश येथील गतिरोधकाचा प्रश्न मार्गी लागणार ; अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, रस्ता सुरक्षा समितीचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रवींद्र तोंडे, वाहतूक शाखा प्रमुख सुभाष सानप यांनी केली पाहणी :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- ( दि.२६) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावरील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी गेल्या ३-४ वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी वारंवार पुकारलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून अखेर दखल घेण्यात आली असुन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्हा सुरक्षा रस्ता समितीत हा विषय घेतल्यामुळे त्यांच्या आदेशाने आज दि.२६ गुरुवार रोजी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, रस्ता सुरक्षा समितीचे सचिव तथा बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे आणि वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप यांनी लिंबागणेश येथे पाहणी केली. यावेळी डॉ.गणेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, भालचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक हावळे व शिक्षकवृंद उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे,वाहतुक शाखेचे प्रमुख सुभाष सानप यांनी प्रत्यक्ष पाहणी करत संवाद साधत, सुचना फलक लावण्याच्या सुचना देत संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग आधिका-यांना लेखी पत्रकाद्वारे कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ.गणेश ढवळे आणि हरिओम क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
—
गेल्या ३-४ वर्षांपासून डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्तारोको, अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आदी लक्ष्यवेधी आंदोलने करण्यात आली होती.तर. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांनी दि.१६ जुन रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर कंत्राटदाराने तात्पुरता स्वरूपात रंबलिंग स्ट्रीप मारून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता.मात्र हरिओम क्षीरसागर यांनी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याने गतिरोधकाची मागणी लावून धरत दि.२५ जुन रोजी “आमदार आपल्या गावी, आपल्या दारी”विशेष मोहिमेंतर्गत आ. संदिप क्षीरसागर यांच्या कार्यक्रमात बेलगाव याठिकाणी गतिरोधकाचा मुद्दा लावून धरत पाठपुरावा केला.अखेर आज वरीष्ठ आधिका-यांनी पाहणी करत सकारात्मकता दर्शवली त्यामुळे गतिरोधकाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.



