बीड

ल.ना. होशिंग विद्यालयातील खेळाडूंचा राज्यस्तरावर डंका : कुस्ती स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक

ल.ना. होशिंग विद्यालयातील खेळाडूंचा राज्यस्तरावर डंका : कुस्ती स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक

जामखेड प्रतिनिधी –क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा खोपोली येथे दिनांक ६ व ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चि. राज गोविंद अवसरे यांनी ६५ किलो खालील वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तर चि. आण्णा कांबळे यांनी ५५ किलो खालील वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

चि. राज गोविंद अवसरे व चि. आण्णा कांबळे या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ल.ना. होशिंग विद्यालयाच्या क्रीडा विभागाने खेळांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी सुरू ठेवल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमकदार यश मिळवून जामखेड तालुक्याचे नाव राज्यात झळकवले आहे, ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. या उल्लेखनीय यशामुळे ल.ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सचिव अरुणशेठ चिंतामणी, सहसेक्रेटरी डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, सर्व संचालक व प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, तसेच ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व अध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून मार्गदर्शक क्रीडा अध्यापक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंखे, धिरज पाटील, बापू जरे यांच्या कार्याचीही प्रशंसा करण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Back to top button