बीड

जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत “पंच भाऊ “या पुस्तकाचे महावाचन

जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत “पंच भाऊ “या पुस्तकाचे महावाचन

शिक्षकाने रट्टा दिला तर अनेकांच्या शाळेच्या वाटा चुकल्या पण बापाने रट्टा दिला तर शिक्षणाचा पट्टा चालू होतो- एकनाथ चव्हाण

जामखेड प्रतिनिधी;-रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत “पंच भाऊ “या पुस्तकाचे लेखक एकनाथ चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून “पंच भाऊ” पुस्तकाचे पाचशे प्रति उपलब्ध करून दिल्या .

या उपक्रमा मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे सहाशे विद्यार्थी सहभागी होऊन वाचन केले.या वेळी प्रमुख उपस्थित प्राचार्य मडके बी के, पर्यवेक्षक विकास कोकाटे रघुनाथ मोहोळकर , साळुंके बी एस, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे ,संभाजी इंगळे एनसीसी मयुर भोसले, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार आदी नागेश विद्यालय शिक्षक उपस्थित होते.यावेळी विद्यालयाच्या वतीने लेखक एकनाथ चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

या पुस्तकामध्ये ग्रामीण जीवनातील पंचांची भूमिका व वडिलांचे महत्त्व ,जीवनातील वडिलांचे स्थान , मुलगा व बाप या नात्याचे सोपे शब्दात मांडणी केली आहे.
यावेळी एकनाथ चव्हाण मनोगतामध्ये म्हणाले की,मी नागेश विद्यालय माजी विद्यार्थी असून याच विद्यालयात माझे पुस्तकाचे आनंदायी शनिवार अंतर्गत वाचन उपक्रम घेताना मला अभिमान वाटत आहे.
विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे व वाचनाची आवड निर्माण व्हावी या उपक्रमाचा उद्देश आहे. श्यामची आई जसे आई विषयी पुस्तक आहे तसे “पंच भाऊ” हे वडिलांविषयी पुस्तक आहे.बापाने रट्टा दिला तर शिक्षणाचा पट्टा आपोआप चांगल्या पद्धतीने चालू होतो.असे प्रसंग या पुस्तकात आहेत व त्यातूनच विद्यार्थ्यांची प्रगती होते असे मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य मडके यांनी मनोगतात सांगितले की,चव्हाण सर हे आदर्श शिक्षक असून “पंच भाऊ” पुस्तक अतिशय उत्कृष्ट लिहिलेले आहे. जामखेड तालुक्यात अतिशय लोकप्रिय पुस्तक होत आहे विद्यार्थ्यांना या पुस्तकातून ग्रामीण जीवनातील पंचाची भूमिका व वडिलांविषयी विविध पैलूचे दर्शन व वडिलांचे महत्व या पुस्तकातून होत आहे भाऊ हे व्यक्तिमत्व नावाजलेले आहे.
यावेळी युवा पत्रकार धनराज पवार यांची दैनिक सुर्योदय च्या उपसंपादक पदी निवड झाल्यामुळे तसेच सुवर्णपदक विजेत्या शाळेच्या दोन खेळाडूचाही सन्मान करण्यात आला.
या पंच(भाऊ)पुस्तकास रयत संकुलाच्या वतीने शुभेच्छा दिल्या असे मनोगत व्यक्त केले.

शेवटी विद्यार्थ्यांनी पुस्तकातील विविध प्रसंगाचे वर्णन स्वतःच्या भाषेत करून पुस्तक अतिशय चांगले आहे असे मत व्यक्त केले.

Back to top button