बीड
आष्टी मतदारसंघात भाजप महायुतीच्या विजयाचा जल्लोष; बसवराज पाटील यांच्या दणदणीत विजयाचे उत्साहात स्वागत

आष्टी मतदारसंघात भाजप महायुतीच्या विजयाचा जल्लोष; बसवराज पाटील यांच्या दणदणीत विजयाचे उत्साहात स्वागत
आष्टी प्रतिनिधी बीड-लातूर–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयात लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांनी निवडणूकीत प्रभावी नियोजन व तगडी फिल्डिंग लावत महत्त्वाची भूमिका बजावली.
या विजयानंतर आष्टी येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



