📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात 13 एप्रिल रोजी होणाऱ्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळ्यास उपस्थित रहावे: पप्पू कागदे

बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात 13 एप्रिल रोजी होणाऱ्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळ्यास उपस्थित रहावे: पप्पू कागदे
बीड/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतराची घोषणा केली होती. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा करून 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी तथागतांच्या बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन सारा भारत बौद्ध धम्ममय करण्याचा संकल्प केला होता.
      तथागतांच्या बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सोमवार दि.13 एप्रिल  रोजी सकाळी, १० वाजता नागसेन बुद्ध विहार पालवण चौक, बीड या ठिकाणी तथागतांच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
          बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळ्यास पुज्य भिक्खु डॉ. इंदवंस्स महाथेरो (छ. संभाजीनगर),
पुज्या भिक्खु धम्मशील थेरो (महाविहार धम्मभूमी शिवणी),पूज्य भिक्खु अश्वजित (छ. संभाजीनगर),
पुज्य भिक्खु पंय्यावर्धन (हिंगोली), पुज्य भिक्खु सुमेधबोधी (छ. संभाजीनगर) पुज्य भद्रेय (छ संभाजीनगर) आदी उपस्थित राहणार आहेत.
        सोमवार दि.13 एप्रिल 2026  रोजी सकाळी ठिक 10 वाजता नागसेन बुद्ध विहार पालवण चौक बीड येथे आयोजित बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळ्यास बीड शहरातील सर्व उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहराचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
Back to top button