बीड

भुतवडा तलावाची मुख्य पाईपलाईन फुटली; जामखेड शहराचा आजचा पाणीपुरवठा बंद

भुतवडा तलावाची मुख्य पाईपलाईन फुटली; जामखेड शहराचा आजचा पाणीपुरवठा बंद

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी भुतवडा तलावावरून येणारी मुख्य पाईपलाईन रविवार (दि. १५ मार्च) रोजी पहाटे दोनच्या सुमारास अचानक फुटल्याने शहराचा आजचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरातील विविध भागांमध्ये रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याकडून खासगी खोदकाम सुरू असताना ही मुख्य पाईपलाईन फुटली. या तांत्रिक बिघाडामुळे तलावावरून होणारा पाणी उपसा तातडीने बंद करण्यात आला. परिणामी शहरातील पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरता आल्या नाहीत.
जामखेड नगरपरिषदेमार्फत तातडीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवार (दि. १६ मार्च) पासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली असून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.

Back to top button