शिक्षणासोबत कला व संस्कारांची जोड आवश्यक – संतोष फिरोदिया

शिक्षणासोबत कला व संस्कारांची जोड आवश्यक – संतोष फिरोदिया
ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
जामखेड प्रतिनिधी : ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलसारख्या शैक्षणिक संस्थेमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे तर संस्कार, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचीही संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यातही ही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आहे, असे मनोगत जामखेड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष फिरोदिया यांनी व्यक्त केले.
शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक प्राध्यापक कैलास माने तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष फिरोदिया उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका वर्षाताई माने, डॉ.अल्ताब शेख, बीड जिल्हा आरोग्य समितीचे डॉ.आबेद जमादार,सागर अंदूरे,कपिल माने तसेच या कार्यक्रमासाठी आकाश बाफना, शिवकुमार डोंगरे, प्रफुल सोळंकी,किरण रेडे आदी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत लोकगीत, हिंदी व मराठी चित्रपटातील गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून पुणे येथील प्रसिद्ध निवेदक / हास्यकलाकार अवधूत कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना फिरोदिया म्हणाले की, आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम पाहून त्यांच्या अंगी असलेली कला, मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही पुढे यावे, असे कार्यक्रम त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात मोठ्या संधी निर्माण होतात.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे संचालक प्राध्यापक कैलास माने यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव मिळावा, यासाठी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल सातत्याने प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपॉल रिया आरोरा यांच्या सह आदी अधिक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*
१. अमीना नवाज शेख – ९५.८५% (सुवर्णपदक)
२. आरिशा आबेद जमादार – ५४.३५% (सुवर्णपदक)
३. आर्या अशोक दहिफळे – ९२.१८%
४. आरुष बाळासाहेब दिडुल – ५०%
५. रुद्र गणेश खटावकर – ६१%
६. श्रेयस सुभाष टेकाळे – ६१.७९%
७.श्रेयस अशोक दहिफळे – सहभाग
८. साक्षी शीतल सोळंके – ७५.६२%
९.. दर्शना निलेश बोरा – ६१.९४%
१०. श्रुती दिनेश राळेभात – ६५.६५%
११.हसनैन इम्रान शेख – ६४.०४%
१२. शुभांगी रविंद्र सपकाळ – सहभाग
१३. स्वरांली भारत शेळके – सहभाग
१४. अधिरा मंगेश पवार – सहभाग
१५. आरोशी राजेश काळे – सहभाग
१६. रोहन योगेश डोके – सहभाग



