लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व ग्रामपंचायत वरवठणे यांच्या विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व ग्रामपंचायत वरवठणे यांच्या विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न
उ रा जिल्हा प्रतिनिधी-: नारायण म्हात्रे
लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व ग्रामपंचायत वरवठणे यांच्या विद्यमाने बुधवार १४ मे रोजी वरवठणे येथील श्री हनुमान मंदीरात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदरच्या शिबिराचे उद्घाटन वरवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर सकाळी ०९ ते दुपारी ०४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते, सदर नेत्र तपासणी शिबिरात ६० रुग्णांनी तपासणी करून घेतली. तसेच मोतीबिंदू ०७ व मोफत चष्मा १० रुग्णांनी सुध्दा या शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिराचे उद्घाटन प्रसंगी वरवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा म्हात्रे, उपसरपंच विजय पाटील, सदस्य गणपत लक्ष्मण म्हात्रे, ग्रामपंचायत अधिकारी देवता भंडारे, माजी उपसरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे, लिपिक सुनिल बैकर, आकाश करजेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. धनश्री ढोले, संयोजक दत्तात्रेय ठाकूर, सोनिया माळी, विपुल झावरे यांनी या शिबिरात रुग्णांची योग्य ती तपासणी करून शिबीर यशस्वी केले.



