बीड

गेवराई आणि पवार घराण्याचे तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत ,नगर परिषदेला पाहिजे तेवढा निधी देऊ  – आमदार सुरेश धस 

गेवराई आणि पवार घराण्याचे तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत ,नगर परिषदेला पाहिजे तेवढा निधी देऊ  – आमदार सुरेश धस
गेवराई  : गेवराई शहरातील नागरिकांचे आणि बाळराजे पवार यांच्या कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार गिताभाभी पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात शंकाच नाही. मायबाप मतदारांनी “छप्पर फाड” विजय मिळवून द्यावा,
शहराच्या विकासासाठी आमचे  सरकार निधी कमी पडू देणार नाही. असे वचन देऊन, गेवराई च्या जनतेने माजी मंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेची सत्ता द्यावी, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.रविवार ता. 16 रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आमदार सुरेश धस यांनी गेवराई शहरात येऊन भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घेतला. माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांच्या निवासस्थानी आ. धस यांनी भेट देऊन नगर परिषदेचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार ॲड. लक्ष्मणराव पवार, युवा नेते बाळराजे पवार, शिवराज पवार, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, ॲड.भगवान घुंबार्डे, राहुल खंडागळे, अरूण मस्के, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, भरत गायकवाड, शिनू भाऊ बेदरे, लक्ष्मण राऊत, जगन पवार, लक्ष्मण चव्हाण, संजय इंगळे, शेख राजू ,शेख रईस,राजू पठाण, वाजेद चौधरी, बाळासाहेब गायकवाड, भैय्या कांबळे, रंजीत खाजेकर, मुन्ना शेठ, विठ्ठल मोटे, सय्यद एजाज,
यांच्यासह शेकाडो कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार धस म्हणाले की, गेवराई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बाजुने जनतेमधून चांगला कौल आहे. महाराष्ट्रात सत्ता आहे. केन्द्र सरकार ही आपले आहे. तुम्ही नगर परिषद आमच्या ताब्यात द्या, गिताभाभींना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक निधी देऊ, असे आवाहन ही आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

Back to top button