मराठवाडा भुसंपादन रेल्वे प्राधिकरण पिठासन अधिकारी पद 20 महिन्यांपासून रिक्त
शेतकरी आंदोलनाच्या तयारीत- आन्नासाहेब मतकर, मोहन गुंड
बीडः महाराष्ट्र शासनाने मराठवाडा भुसंपादन, रेल्वे प्राधिकरण पिठासन अधिकार्याची 20 महिन्यापासून जागा रिक्त आहे. त्यांची नेमणूक केलेली नाही. 1500/2000 भुसंपादन प्रकरणे छत्रपती संभाजीनगर कार्यालयात पडून आहेत. एक महिन्यात पिठासन अधिकार्याची नेमणूक न केल्यास राष्ट्रीय समाजपक्ष शेतकरी कामगार पक्ष, विरोधी पक्ष पदाधिकार्याची बैठक होवून जुनमध्ये आंदोलन करण्यात येईल असे आन्नासाहेब मतकर, मोहन गुंड यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना शेकडो मेल, निवेदन, पत्रव्यवहार करुनही त्यांचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच प्रत्यक्ष भेटूनही यावर काही तोडगा काढला नाही. पिठासन अधिकार्यांची नेमणूक एक महिन्यात न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी, रासप अध्यक्ष आण्णासाहेब मतकर, शेकाप नेते मोहन गुड, शिवशक्ती/भिमशक्ती नेते बाळासाहेब मोरे, सामजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, शिवसंग्राम नेते नारायण काशिद, भगवान माने, वसंत टेके, अनिल म्हेेत्रे, चिंतामन कांबळे यांनी दिला आहे.