बीड

कायदा सुव्यवस्थेत पोलिसांची महत्त्वाची भूमिका – प्राचार्य बाळासाहेब पारखे

कायदा सुव्यवस्थेत पोलिसांची महत्त्वाची भूमिका – प्राचार्य बाळासाहेब पारखे

ल. ना. होशिंग विद्यालयाच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी – दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयाच्यावतीने नव्याने नियुक्त झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी यांचा जामखेड पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य पारखे म्हणाले की,पोलीस प्रशासन हे समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी यांचा सत्कार करण्याचा आम्हाला योग आला, याचा आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे.
श्री. चौधरी यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्त्वगुणांचा जामखेड शहराला निश्चितच फायदा होईल, अशी मला खात्री आहे. विद्यालयाच्यावतीने त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे,उपप्राचार्य शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने,शिक्षक बबन राठोड,भरत लहाने,प्रा.विश्वनाथ आघाव,कलाशिक्षक मुकुंद राऊत,पोपट जगदाळे, हनुमंत वराट, विशाल पोले, राघवेंद्र धनलगडे,उमाकांत कुलकर्णी,निलेश भोसले, रोहित घोडेस्वार, आदित्य देशमुख,संतोष देशमुख,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button